शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित पोलिस अधिकाऱ्याने ने जावयाची केली हत्या, कोर्टाच्या आवारातच झाडल्या गोळ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 18:04 IST

Crime News: चंडीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस दलातील निलंबित एआयजी मलविंदर एस. सिद्धू यांनी जमिनीच्या वादामधून त्यांच्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केली.

चंडीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंजाब पोलीस दलातील निलंबित एआयजी मलविंदर एस. सिद्धू यांनी जमिनीच्या वादामधून त्यांच्या जावयाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत तरुण हा आयआरएस अधिकारी होता. त्याच्यात आणि आरोपी सासऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. तसेच त्याची सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती. या सुनावणीसाठीच सासरे आणि जावई कोर्टामध्ये आले होते. त्यामधून या गोळीबाराची घटना घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना चंडीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितलं की, आम्हाला आज दुपारी दोन वाजता जिल्हा कोर्टातील मीडिएशन सेंटरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. गोळीबारात जखमी झालेल्या हरप्रीत सिंह याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मलविंदर एस. सिद्धू याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्याच्याकडील हत्यारही जप्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, एसएसपी कंवरदीप यांनी सांगितले की, आरोपी मलविंदर सिंग हा  पंजाब पोलीस खात्यामध्ये एआयजी होता. एफएसएल पथकाला बोलावून घटनास्थळाची तपासणी केली जात आहे. तसेच आम्ही प्रत्यक्षदर्शींसोबत बोलून माहिती घेत आहोत. आरोपी कुठल्या गेटमधून कोर्टाच्या आवारात आला याचीही माहिती घेत आहोत. आरोपीकडून .३२ बोअरची एक पिस्तूल जप्त केली आहे. तसेच आम्ही पिस्तुलामधूल चालवलेल्या ४ आणि न चालवलेल्या ३ गोळ्या जप्त केल्या आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारPoliceपोलिसCourtन्यायालय