शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shoe Theft: धावत्या ट्रेनमध्ये सिटखालून चोरीस गेलं चप्पल, आता दोन राज्यांतील पोलीस घेताहेत शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 12:18 IST

Shoe Theft In Train: धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला  आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत.

मुझफ्फरपूर - धावत्या ट्रेनमधील सिटखालून एका व्यक्तीचं चप्पल चोरीस गेलं असून, याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोलीस या चपला  आणि चप्पल चोरी करणाऱ्या चोराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चप्पल चोरी केल्या प्रकरणी झीरो एफआयआर नोंद केली आहे. आता सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे त्याने सिटखाली पाहिलं तर चपला चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर त्याने रेल्वे मदत अॅपवर तक्रार नोंद केली.

या प्रकरणातील पीडिताचं नाव राहुल कुमार झा असं आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार जयनगर क्लोन स्पेशल ट्रेन नंबर ०४६५२ च्या बी-४ डब्यातील ५१ नंबर सिटवर बसला होता. तो अंबाला स्टेशनवरून प्रवास करत होता. या दरम्यान, त्याच्या चपला चोरीस गेल्या. सहसा किरकोळ चोरीच्या तक्रारी लोकांकडून दाखल केल्या जात नाहीत. मात्र राहुल कुमार झा याने चपला चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली. 

मुझफ्फरपूर रेल्वे पोलीस स्टेशनचा रेफरन्स देत राहुल कुमार झा याने मुरादाबादमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता चोरीस गेलेल्या चपला आणि चोराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारीमधील नोंदीनुसार राहुल कुमार झा याच्या चपला निळ्या रंगाच्या असून, त्या कॅम्पस कंपनीच्या आहेत.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके