शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

योगी आदित्यनाथांचा जबरा फॅन, भेटण्यासाठी राजस्थानहून पायी पोहोचला गोरखपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:03 IST

Chief Minister Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांच्याप्रति निष्ठा असलेले राजस्थानचे मामचंद आनंद हे पायीच त्यांना भेटण्यासाठी गोरखनाथ मंदिरात पोहोचले.

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याप्रति निष्ठा असलेले राजस्थानचे मामचंद आनंद हे पायीच त्यांना भेटण्यासाठी गोरखनाथ मंदिरात पोहोचले.

मामचंद आनंद यांच्यावर नाथपंथ आणि योगी आदित्यनाथ यांचा खूप प्रभाव आहे. ते पंथात सामील होऊन अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे मार्गदर्शन घेत आहेत. जयपूरचे रहिवासी असलेले मामचंद आनंद हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. ते 3 मुलांचे वडील आहेत आणि आता त्यांना संन्यासी जीवनात येऊन अध्यात्माची गूढ रहस्ये समजून घ्यायची आहेत.

मामचंद आनंद म्हणतात की, शिवावतारी गुरु गोरक्षनाथद्वारे प्रवर्तित नाथपंथाचा त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्या मते यामागे पंथ कारणीभूत आहे आणि सध्या गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्‍वर योगी आदित्यनाथ हेही मुख्यमंत्री या नात्याने पंथाचे ध्येय पूर्ण करत आहेत.

जयपूर येथून चालण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना त्यांच्या नवीन साधना मार्गावर त्यांची भक्ती दाखवता येईल. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल, अशी मामचंद यांना आशा आहे.

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून होळीच्या शुभेच्छा!दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी यांनी होळीच्या शुभेच्छा देत रंग, उत्साह आणि जल्लोषाचा हा सण सभ्यतेने साजरा केला पाहिजे, असे सांगितले. उत्साहात संवेदना गमावू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. होळीच्या दिवशी सर्वांच्या भावनांची काळजी घ्या. जर एखाद्या व्यक्तीला आरोग्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे रंग खेळायचे नसतील तर त्याच्यावर रंग लावू नका. घाण फेकू नका किंवा कोणाच्याही डोळ्यांना इजा करू नका. होळीचा सण हा त्या शाश्वत संस्कृतीचा एक भाग आहे, ज्याने जगाला वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनरुचा मंत्र दिला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथJara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश