Hot air balloon accident Video: बारां जिल्हा निर्मितीच्या ३५व्या वर्धापन दिनानिमित्त हॉट एअर बलून शोचे आयोजन करण्यात आले होते. एअर बलूनची चाचणी करत असताना अचानक हवेचा दाब वाढला आणि वेगाने बलून हवेत गेला. यावेळी दोरी पकडलेला व्यक्तीने वर खेचला गेला. ८० फुटांवर असताना अचानक दोरी तुटली आणि तो व्यक्ती जमिनीवर येऊन पडला. यात त्याला जीव गमवावा लागला.ॉ
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थानमधील बारां जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (१० एप्रिल) ही घटना घडली. हॉट एअर बलून शो दरम्यान बलूनमध्ये हवा भरण्यात येत होती. पण, अचानक हवेचा दाब वाढला आणि बलून वेगाने वर गेला.
दोरीला पकडले आणि लटकला
बलून वेगाने वर जात असताना त्याची दोरी धरलेला व्यक्तीही वर खेचला गेला. जमिनीपासून ८० फूट वर उंचीवर असताना हवेच्या दाबाने बलून वर गेले आणि दोरी ताणली गेल्याने तुटली. त्यानंतर ४० वर्षीय व्यक्ती जमिनीवर येऊन आपटला.
VIDEO: या बाबतीत अजिबात तडजोड नाही; एकाच ड्रेससाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत व्यक्तीचे नाव वासुदेव खत्री असे आहे. तो मूळचा कोटा येथील रहिवासी होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मयत व्यक्ती हा गेल्या २० वर्षांपासून हॉट एअर बलून हातळण्याचे काम करायचा. त्याला मोठा अनुभव होता, असे बारां शहरचे पोलीस आयुक्त ओमेंद्र सिंह शेखावत यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
सुरूवातीला आमदाराने घेतला हॉट एअर बलूनचा अनुभव घेतला. आमदार राधेश्याम बैरवा हे त्यांच्या साथीदारांसह हॉट एअर बलूनमध्ये बसले होते. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना हॉट एअर बलूनमध्ये बसवले जाणार होते. त्याआधी चाचणी घेतली जात असतानाच ही घटना घडली.