शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:35 IST

India गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आता भारताला ट्रम्प यांच्या या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला आहे.

गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आता भारताला ट्रम्प यांच्या या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला आहे. तसेच भारताचा पूर्वीपासूनचा मित्र रशिया हा भारतासाठी पुन्हा एकदा ढाल बनून समोर आला आहे. भारत आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशिया ब्लॉकदरम्यान ट्रे़ड डीलबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनने बुधवारी मॉस्कोमध्ये एका मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू करण्यासंदर्भातील अटीशर्तीवर स्वाक्षऱ्या केल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान हे करारा झाले आहेत.

ईएईयूमध्ये अर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिज प्रजासत्ताक आणि रशियाचा समावेश आहे. भारत सध्या नव्या बाजारपेठेमधील विविधीकरण णि मुख्य व्यापारी भागीदारांसह  अनेक व्यापारी करार करत आहे. भारताने हल्लीच इंग्लंडसोबत एफटीएवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच युरोपीयन संघासोबतसुद्धा करारासाठी चर्चा सुरू आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावादरम्यान भारताकडून जागतिक बाजारपेठेमध्ये नव्या संधींचा शोध घेतला जात आहे.  तसेच जुना मित्र असलेल्या रशियासोबतही आर्थिक संबंध भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. रशिया हा ईएईयूमधील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तसेच या ब्लॉकसोबत भारताच्या असलेल्या एकूण व्यापारापैकी ९२ टक्के व्यापार हा एकट्या रशियासोबत होतो. या करारासंदर्भातील अटीशर्तींवर भारताकडून वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अजय भादू आणि युरेशियन इकॉनॉमिक कमिशनच्या व्यापार नीती विभागाचे उपसंचालक मिखाईल चेरेकाएव्ह यांनी  स्वाक्षऱ्या केल्या. यादरम्यान भादू यांनी ईईसीचे व्यापार प्रभारी मंत्री आंद्रेई स्लेपनेव यांच्याशीही चर्चा केली. दोघांनीही भारत आणी ईएईयू यांच्यातील वाढत्या व्यापार कारभाराबाबत चर्चा केली. तो सुमारे ६९ दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे.  

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाTrade Tariff Warटॅरिफ युद्धS. Jaishankarएस. जयशंकर