शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

3 मुलांच्या आईचं 19 वर्षाच्या भाच्यावर जडलं प्रेम; पतीपासून घटस्फोट न घेताच गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:53 IST

राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे 3 मुलांची आई तिच्या 19 वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने 3 मुलांना सोडून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. यापुढेही त्यांना एकत्र राहायचे आहे. त्यासाठी कायद्याचा आधार घेण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सुरक्षेची विनंती देखील केली. महिलेच्या आई-वडिलांना आणि सासरच्या मंडळींना या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

प्रेमी युगुलाने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मागील चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. वर्षभरापूर्वी महिलेने हा प्रकार घरच्यांना सांगितला असता पती आणि कुटुंबीयांनी तिला मारहाण केली. पुढे दोघांच्या प्रेमप्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी ही महिला सासरच्या मंडळींना न सांगता रतनगड येथे प्रियकर भाच्याकडे पोहोचली. त्यानंतर दोघांनी सोमवारी रतनगड न्यायालयातून त्यांच्या नात्याचा दाखला तयार करून घेतला. 

11 वर्षांपूर्वी महिलेचे झाले होते लग्न संबंधित महिला चुरू येथील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. तिचे लग्न 11 वर्षांपूर्वी सीकर येथील तरुणाशी झाले होते. साडेचार वर्षांपूर्वी त्याचा भाचा सीकर येथे मामाकडे आला होता. तो रतनगडचा रहिवासी आहे. यादरम्यान दोघांमधील चर्चेचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. मात्र नातेवाईकांना ही बाब समजताच एकच खळबळ माजली. महिलेने सांगितले की, पतीने तिला मारहाण केली आणि भाचाच्या संपर्कात राहायचे नाही असे सांगितले. 

प्रियकर भाचाने प्रेयसी मामीला हॉटेलात ठेवले मामी आणि भाचाचे प्रेमकरण सर्वांसमोर येताच त्यांच्या घरच्यांनी प्रेमी युगुलावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. पण भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या मामीने १९ डिसेंबर रोजी पती आणि मुलांना सोडून पळ काढला. ती रतनगड येथे प्रियकर भाच्याजवळ गेली. तिथे तिला भाच्याने एका हॉटेलमध्ये ठेवले. तिथे राहताना त्यांनी लिव्ह इन प्रमाणपत्र दाखवले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न