शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

डीप फेकद्वारे ८ मुलींचे नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या नराधमाला अटक; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 18:46 IST

सध्या डीप फेकचा गैरवापर सुरू असून यामाध्यमातून सेलिब्रेटींना लक्ष्य केले जात आहे.

रांची: सध्या डीप फेकचा गैरवापर सुरू असून यामाध्यमातून सेलिब्रेटींना लक्ष्य केले जात आहे. अशातच डीप फेकद्वारे अल्पवयीन मुलींचे नग्न व्हिडीओ बनवणाऱ्या नराधमाच्या मुसक्या रांचीपोलिसांनी आवळल्या आहेत. विद्यार्थिनींचे नग्न व्हिडीओ बनवून संबंधित आरोपी इन्स्टाग्रामवर व्हायरल करायचा. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या नराधमाचे नाव विवेक शाह असे आहे. आरोपी विवेकने रांचीच्या आठ मुलींचे फोटो गोळा केले आणि त्यांचे खोटे व्हिडीओ बनवले. 

या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पथक सक्रिय झाले आणि आरोपी विवेकचे लोकेशन शोधून त्याला अटक करण्यात आली. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार मेहता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांचे फोटो डीपफेक व्हिडीओंमध्ये बदलायचा. तरूणाच्या या कृत्याचा बळी ठरलेल्या काही मुलींनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. 

दरम्यान, सर्व मुली अल्पवयीन असल्याचे उघड झाले. नग्न व्हिडीओ बनवण्यासाठी आमच्या फोटोंचा गैरवापर केला जात असून तो सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याची तक्रार मुलींनी केली. रांची पोलिसांनी मुजफ्फरपूर येथून अटक केलेल्या तरुणाची तुरूंगात रवानगी करण्यात आली. चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. या कृत्यात त्याचा आणखी कोण साथीदार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. विवेक मोठा गुन्हेगार - पोलीस विवेक हा मोठा गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विवेकने सर्वप्रथम सोशल मीडियावर स्वत:ची प्रोफाइल तयार केली आणि स्वतः पैसेवाला असल्याचे भासवले. अनेक मुलींना फसवल्यानंतर त्याने रांचीतील एका मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला जाळ्यात अडकवून तिच्याकडून नग्न फोटो मिळवले. यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला आणि तिच्या मैत्रिणींचे फोटो मागू लागला आणि त्यानंतर तो डीपफेक फोटोंच्या माध्यमातून न्यूड व्हिडीओमध्ये टाकून सोशल मीडियावर व्हायरल करायचा.

टॅग्स :Biharबिहारranchi-pcरांचीArrestअटकPoliceपोलिस