शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तांदूळ चोरीच्या संशयावरून दलित व्यक्तीला झाडाला बांधून बेदम मारहाण; पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:13 IST

छत्तीसगड येथील एका गावात एका दलित व्यक्तिला तांदूळ चोरीच्या आरोपा प्रकरणी झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे.  येथे रविवारी सकाळी एका दलित व्यक्तीला तांदूळ चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी एका आदिवासी व्यक्तीसह तिघांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. हे मॉब लिंचिंग असल्याचा काहींनी दावा केला आहे. हे बीएनएस अंतर्गत गुन्ह्याच्या व्याख्येत येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेली माहिती अशी, ही घटना डुमरपल्ली गावात रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र सिदार आहे. काही आवाजामुळे ते जागे झाले व झोपेतून उठल्यावर पंचराम सारथी उर्फ ​​बुटू हा आपल्या घरात घुसून तांदळाची पोती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे पाहून ते संतापले आणि त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. यानंतर अजय प्रधान आणि अशोक प्रधान आले. त्यानंतर तिघांनी मिळून सारथीला झाडाला बांधले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने सकाळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि सकाळी सहा वाजता पोलीस तेथे पोहोचले तेव्हा सारथी बेशुद्ध अवस्थेत एका झाडाला बांधला होता. त्याला बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली आणि लाथ आणि ठोसे मारण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.अटक करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

मॉब लिचिंगच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 103 (2) मध्ये मॉब लिंचिंगची व्याख्या अशी केली आहे, 'जेव्हा पाच किंवा अधिक व्यक्तींचा समूह एकत्र येतो. 'जो कोणी खून करेल, अशा गटातील प्रत्येक सदस्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि दंडही होईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस