शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेला भेटायला आलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी पकडलं; दोघांनाही बांधून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:54 IST

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावमधील बारसगवार पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत दुसऱ्या गावातील तरुणाचे प्रेमसंबंध होते. खरं तर संबंधित प्रेयसी विवाहित आहे. प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकर गुरुवारी रात्री उशिरा तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिथे दोघांनाही गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि एकत्र बांधून मारहाण केली. 

गावकऱ्यांनी या प्रेमी युगुलाला पकडले आणि दोघांनाही एकमेकांना बांधून मारहाण करण्यात आली. प्रियकर गावकऱ्यांची माफी मागत राहिला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या ताब्यातून दोघांची सुटका केली. प्रियकराची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.  

विवाहितेला भेटणं पडलं महागात खरं तर एका विवाहित महिलेचे करमी गावात राहणाऱ्या एका अविवाहित तरुणाशी प्रेमसंबंध होते. रात्री उशिरा महिलेच्या फोनवरून प्रियकर तिच्या घरी पोहोचला. काही वेळाने परिसरातील लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले आणि त्यांना मारहाण केली. प्रियकर हात जोडून गावकऱ्यांकडून सुटकेसाठी प्रयत्न करत होता. मात्र गावकरी त्याला मारहाण करत होते. प्रकृती गंभीर झाल्याने तो बेशुद्ध झाला.

पोलिसांनी दिले कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचीही गावकऱ्यांच्या ताब्यातून सुटका केली. त्याचवेळी या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित तरुणाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी बारसागवार पोलीस ठाणे गाठून मलुहाखेडा गावातील पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. विवाहित महिलेचा पती हैदराबाद, तेलंगणा येथे एका हॉटेलमध्ये काम करतो आणि महिलेला दोन मुले आहेत, असे सांगितले जात आहे. बारसागवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस