शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विवाहित प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:34 IST

Murder and Suicide in Love Affair in Gwalior: मध्य प्रदेशातील ग्वालियर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील ग्वालियमध्ये हत्या आणि आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला आपल्या दुकानात बोलावून तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर मंदिरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. यात विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियकराचा 24 तासांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. हत्या आणि आत्महत्येची ही घटना ग्वालियरच्या भितरवार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनगड गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरूणाचे आई-वडील, भाऊ आणि काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवारी घडली. मोहनगड येथे माहेरी आलेल्या मालती चौहान या विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्या पवन राणा या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने मालतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पवनने मंदिरात जाऊन स्वतःवर गोळी झाडली. रक्तबंबाळ झालेल्या मालतीला भितरवार रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी झालेल्या पवनला भितरवार येथून उपचारासाठी ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 24 तासांनंतर पवनचाही मृत्यू झाला.

महिलेच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बंदुक जप्त केली. मृत महिला मालतीचा भाऊ हरिओमने सांगितले की, मृत आरोपी पवनची आई वंदनाने त्याची बहिण मालतीला आपल्या घरी बोलावले होते. तिथे पवनसह सर्व लोकांनी मिळून मालतीची हत्या केली. मालतीचा भाऊ हरिओमच्या माहितीवरून भितरवार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला. मालतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पवन राणाचे वडील भूपेंद्र राणा, आई वंदना राणा, भाऊ उपेंद्र राणा आणि काका उमराव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.

5 जणांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयराज कुबेर यांनी सांगितले की, मालती आणि पवन दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. माहितीतून स्पष्ट झाले की, पवनने मालतीला सर्वप्रथम गोळी मारली नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मालतीच्या कुटुंबीयांच्या आरोपांनंतर पवनसह 5 जणांवर 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रविवारी आरोपी पवनचा देखील मृत्यू झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू