शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"धोका देणाऱ्या ललिताशी कुणी लग्न करू नका...", प्रेयसीनं फसवलं अन् प्रियकरानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:35 IST

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे प्रेयसी आणि प्रियकर विवाहबंधनात अडकले होते. मात्र, मुलीच्या नातेवाईकांनी दबाव आणण्यास सुरुवात केल्याने महिनाभरातच मुलगी बदलू लागली. हे सहन न झाल्याने प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपवले. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी या तरुणाने एक व्हिडीओ बनवला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मृत तरूणाचे नाव खरवेश असून तो अलीगढचा रहिवासी आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने पत्नी ललिता आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या मुलीशी कोणीही लग्न करू नये, असे खरवेशने म्हटले आहे. तसेच आज या मुलीमुळेच मी आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, अलीगढ जिल्ह्यातील गोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील रहिवासी असलेल्या खरवेशने शेजारील गावातील रहिवासी हरवीर सिंग यांची मुलगी ललिता चौधरी हिच्यासोबत 23 फेब्रुवारी 2023 रोजी गाझियाबादमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. प्रेयसी पत्नी झाल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. ललिता तिच्या नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे वागायची म्हणून यांच्यात सतत भांडण व्हायचे. मुलीचे वडील हरवीर सिंग सतत मुलाला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत ​​होते, असा आरोप मृत खरवेजने व्हिडीओतून केला आहे.  

मित्राच्या घरी संपवलं जीवन मृत खरवेशच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुलीच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे खरवेश 18 मार्च रोजी कृष्णा नगर चौकी परिसरातील मधुबन हॉटेलच्या मागे असलेल्या द्वारकाधीश अपार्टमेंटमध्ये मित्र हिमांशूच्या घरी आला होता. दरम्यान, हिमांशू काही कामानिमित्त घरातून बाहेर गेला आणि यादरम्यान खरवेशने आधी व्हिडीओ बनवला आणि नंतर गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू