शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पराजयातही ९ लाख मतांची आघाडी; ४ राज्याची मिळून भाजपापेक्षा काँग्रेसला अधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 08:04 IST

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपने ऐंशी टक्क्यांहून अधिक मते घेत कोणत्याही स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षांना जवळ केलेले नाही. 

कोल्हापूर - पाचपैकी चार मोठ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होऊन भाजपने बाजी मारली तरी काँग्रेसने ९ लाख ४० हजार मते अधिक मिळवून आघाडी घेतली आहे. भाजपने सर्वाधिक आठ टक्के मते मध्य प्रदेशात घेतली आहेत, तर काँग्रेसने भाजपच्या तुलनेत तेलंगणामध्ये २५ टक्के अधिक मते मिळविली आहेत.

मिझोरामची निवडणूक स्थानिक पक्षात होती. भाजप आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचा पराभव होऊन स्थानिक पक्ष असलेल्या झोरोमा पक्षाला बहुमत मिळाले आहे. या राज्यात भाजप दोन तर काँग्रेसला एकाच मतदारसंघात विजय मिळाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपने ऐंशी टक्क्यांहून अधिक मते घेत कोणत्याही स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षांना जवळ केलेले नाही. 

राजस्थानात फक्त साडेआठ लाख मतांनी मागे, फटका ३९ जागांवर

राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाले, त्या पक्षाला १ कोटी ६५ लाख २३ हजार ५६८ मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला १ कोटी ५६ लाख ६६ हजार ५३१ मते मिळाली आहेत. जागा मात्र भाजपने ११५ जिंकल्या. काँग्रेसला ६९ मिळाल्या. कमी मतांच्या फरकाने जिंकणारे भाजपचे उमेदवार जास्त आहेत.

चार राज्यांत भाजपची एकूण मते कमीचचार राज्यांत काँग्रेसला एकूण ४ कोटी ९० लाख, ६९ हजार ४६२ मते मिळाली आहेत. भाजपला ४ कोटी ८१ लाख २९ हजार ३२५ मतदान झाले आहे. भाजपपेक्षा काँग्रेसला ९ लाख ४० हजार १३७ मते अधिक मिळाली आहेत. काँग्रेसच्या तेलंगणातील विजयाचा यात मोठा वाटा असला तरी इतर तीन राज्यांतील टक्केवारीत काटा लढत झाली आहे.

मध्य प्रदेशात ८, छत्तीसगडमध्ये ४ टक्क्यांचा निर्णायक फरकमध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत आठ टक्क्यांचा फरक आहे. भाजपला ४८.५५ टक्के तर काँग्रेसला ४०.४० टक्के मते मिळाली आहेत. राजस्थानात ४१.६९ टक्के मते भाजपने घेतली तर काँग्रेसला केवळ दोनच टक्के मते कमी मिळाली. काँग्रेसला ३९.५३ टक्के मते मिळाली आहेत. छत्तीसगडमध्ये हा फरक चार टक्क्यांचा आहे. भाजपला ४६.२८ तर काँग्रेसला ४२.२३ टक्के मते मिळाली आहेत. तेलंगणाच्या जोरावर काँग्रेसच्या एकूण मतांमध्ये मोठे अंतर पडले आहे. तेलंगणामध्ये बहुमत मिळविताना काँग्रेसने ३०.४० टक्के तर भाजपला तुलनेत १३.३० टक्के मते मिळाली आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाVotingमतदान