शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर कन्या, तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:36 IST

मध्य प्रदेशमध्ये एका छाप्यात माजी पीडब्लूडी इंजिनिअरच्या घरात मोठं घबाड सापडलं.

मध्य प्रदेशमधील एका माजी पीडब्लूडी च्या इंजिनिअरच्या घरी आज पहाटे लोकायुक्तांनी छापेमारी केली.  यामध्ये मोठे घबाड सापडले आहे, इंजिनिअरच्या घरात नोटांचा ढीग आणि सोने, चांदी मोठ्या प्रमाणात सापडले आहे. २६ लाख रुपये रोख रक्कम सापडली. तसेच मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. हा छापा भोपाळमध्ये टाकला होता. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजेच PWD च्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर हा छापा टाकला होता.  यावेळी लोकायुक्तांनी मोठ्या प्रमाणात अनेक वस्तू देखील जप्त केल्या. इंजिनिअर मेहरा यांनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार करून या मालमत्ता मिळवल्याचा  लोकायुक्तांनी आरोप केलाय.

डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी

चार आलिशान कार जप्त

हा छापा काल गुरुवारी टाकण्यात आला होता. लोकायुक्तांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील माजी पीडब्ल्यूडी मुख्य इंजिनिअरच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. मुख्य अभियंता गोविंद प्रसाद मेहरा यांच्याशी संबंधित चार ठिकाणी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि लाखो रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी भोपाळच्या फ्लॅटमधून २६ लाख रुपये रोख, २.६४ किलो सोने, ५.५ किलो चांदी आणि एफडी कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय, मेहरा यांच्या नर्मदापुरम फार्महाऊसमधून १७ टन मध जप्त करण्यात आला आहे. येथे अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर, फिश फार्म, कॉटेजसह हायटेक उपकरणे देखील जप्त केली आहेत. मेहरा आणि त्यांच्या कुटुंबाच्या चार आलिशान कार देखील येथे जप्त करण्यात आल्या आहेत.

लोकायुक्तच्या छाप्यावेळी अधिकाऱ्यांना गोविंदपुरा येथे मेहराच्या मुलांची मालकीची पीव्हीसी पाईप फॅक्टरी देखील मिळाली. या कारखान्यात अधिकाऱ्यांना रोख रकमेसह असंख्य मालमत्तेची कागदपत्रे सापडली. या मालमत्ता मेहराने अभियंता असताना भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून बांधल्या होत्या, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Engineer's home raided; huge wealth, cash, gold seized in Bhopal.

Web Summary : A former PWD engineer in Madhya Pradesh was raided, revealing a large amount of cash, gold, and property documents. 26 lakh rupees in cash, gold, silver, and documents were seized. Four luxury cars and 17 tons of honey were also found.
टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी