शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:37 IST

राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने एक छुपी लाट आहे आणि लोकसभा निवडणुकीत भाजप १५० जागांपर्यंत मर्यादित राहील, असा दावाही त्यांनी केला.

येथे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई यासारखे मोठे मुद्दे आहेत; परंतु भाजप त्यांच्यापासून जनतेचे लक्ष हटवण्यात गुंतलेला आहे. ते मुद्द्यांवर बोलत नाहीत. राजकारण स्वच्छ करण्यासाठी पारदर्शकतेसाठी निवडणूक रोखे आणल्याचा दावा केला जातो, परंतु तसे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ते का बंद केले, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस-सपा आघाडी चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५-२० दिवसांपूर्वी भाजप १८० जागा मिळतील, असे वाटत होते. आता फक्त १५० जागांपर्यंत जातील, असे दिसते. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की, आमची स्थिती मजबूत होत आहे आणि ‘इंडिया’च्या बाजूने एक सुप्त लाट आहे, असे ते म्हणाले. 

...तर अमेठीतून लढणारउत्तर प्रदेशातील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, अमेठीबाबत पक्ष निर्णय घेईल. मला जो काही आदेश मिळेल, तो मी पाळेन. आमच्या पक्षात हे निर्णय सीईसी (केंद्रीय निवडणूक समिती) बैठकीत घेतले जातात.

ही निवडणूक दोन विचारसरणींतील लढाई मंड्या (कर्नाटक) : आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणींमधील लढाई आहे, एकीकडे राज्यघटनेसाठी लढणारी इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणू पाहणारी भाजपा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी येथील प्रचारसभेत केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा