शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थयात्रेवरून परतताना ९ जणांवर काळाचा घाला; धावत्या बसला लागली आग; १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 13:41 IST

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले.

गुरुग्राम : हरयाणातील नूह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका धावत्या बसला आग लागून त्यातील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला व १५ जण जखमी झाले. त्यातील प्रवासी मथुरा, वृदांवन येथे तीर्थयात्रा करून आपल्या गावी परत जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. त्यातील प्रवासी पंजाबमधील होशियारपूर, लुधियाना येथील रहिवासी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले. जखमी पंधरा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसला कशामुळे आग लागली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बसला आग लागल्याचे लक्षात येताच काही स्थानिक नागरिकांनी या बसचा पाठलाग केला. त्यानंतर चालकाला सावध करून बस थांबवायला सांगितली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस तसेच अग्निशमन दलाला हा प्रकार कळविला. हरयाणातील नूह जिल्ह्यातील भीषण बस दुर्घटनेचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

उपचार सुरू असलेल्या जखमींची प्रकृती स्थिरनूह जिल्ह्यामध्ये बसला आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीदेखील सदर अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

टॅग्स :fireआगpassengerप्रवासीDeathमृत्यू