शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही तास आधी वडिलांनी केली मुलाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण, ऐकून पोलीसही अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:56 IST

Crime News: मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे.

दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलग्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच जन्मदात्या पित्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील देवली परिसरात घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. त्यांना पोलिसांनी गुरवारी रात्री जयपूर येथून ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गौरव सिंघल असं असल्याचं समोर आलं आहे. तो दिल्लीमध्ये जिम चालवत होता. गौरव याची चाकूचे १५ वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता देवली एक्सटेंशनमधील राजू पार्कमधून हत्येच्या घटनेची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान, २९ वर्षीय गौरव सिंघल नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पोहोचले. तेव्हा तिथे खूप रक्त सांडले होते. चाकूने वार केल्यानंतर गौरवचा मृतदेह ओढून नेण्यात आला होता, असे दिसून आले. गौरवचा मृतदेह नातेवाईकांना लगेच मिळू नये, अशी आरोपीची योजना होती, असं त्यामधून दिसून येत होतं.

गौरव सिंघल याचं लग्न ठरलं होतं. तसेच ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील लोक बाजूच्या खोलीत लग्नाशी संबंधित कार्यक्रमासाठी जमले होते. त्याचदरम्यान वडिलांनी तीन इतर व्यक्तींच्या सोबत मिळून मुलाची हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की,  गौरवचे वडील रंगलाल सिंघल घरातून पळताना ५० लाख रुपयांचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी वडिलांचा काही कारणावरून मुलगा गौरव याच्यासोबत वाद झाला होता, त्यावेळी गौरवने वडिलांना मारले होते. त्यानंतर आरोपी रंगलाल याने तीन सहकाऱ्यांसोबत मिळून गौरवची हत्या केली आणि पैसे व दागिने घेऊन फरार झाला.

पोलिसांनी आणखी माहिती देताना सांगितले की, या घटनेमध्ये आणखी एक बाजू समोर आली आहे. मृत गौरव सिंघल याला लग्न करायचं नव्हतं. त्याला दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो लग्न करण्यास तयार झाला होता. त्यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये खूप वाद व्हायचे.  आता ७ मार्च रोजी मध्य रात्री नेमकं काय घडलं, ज्यातून अंकित याची हत्या झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारmarriageलग्न