लहान मुलाचं डोकं तोंडात घेऊन फिरत होता कुत्रा; दृश्य पाहून नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:39 IST2024-01-24T19:38:16+5:302024-01-24T19:39:09+5:30
सीसीटीव्हीमध्ये एक कुत्रा नवजात बालकाचे डोके तोंडात घेऊन फिरत असल्याचं आढळून आलं.

लहान मुलाचं डोकं तोंडात घेऊन फिरत होता कुत्रा; दृश्य पाहून नागरिक हैराण
हरियाणा : नवजात बालकाचं डोकं तोंडात घेऊन एक कुत्रा फिरत असल्याची घटना हरियाणातील हिसार जिल्ह्यातील जवाहर नगरमध्ये घडली आहे. सदर नवजात बालकाचे धड दुसरीकडे पडले होते. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर नगरमधील एका गल्लीत कुत्रा काहीतरी चाटत असल्याचं एका व्यक्तीला दिसलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर ते एका नवजात बालकाचं डोकं होतं. हे चित्र बघताच सदर व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने याबाबतचे माहिती आसपासच्या लोकांना दिली आणि त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये एक कुत्रा नवजात बालकाचे डोके तोंडात घेऊन फिरत असल्याचं आढळून आलं. ज्या दिशेने कुत्रा अर्भकाचं डोकं तोंडात घेऊन आला होता त्याच दिशेला पाहणी केली असता अर्भकाचे शरीरही आढळले. अज्ञात व्यक्तीने पॉलिथिनच्या काळ्या पिशवीत हा मृतदेह फेकला होता.
दरम्यान, एखाद्या अविवाहित मातेने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.