शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डीएनए नमुने न जुळल्याने निर्दोषत्व सिद्ध होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 05:37 IST

आरोपीची याचिका फेटाळली

बंगळुरू : डीएनए नमुने केवळ साहाय्यभूत पुरावे आहेत. त्यामुळे ते न जुळल्याने आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध होणार नाही, असे स्पष्ट करत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका ४३ वर्षीय बस वाहकाची याचिका फेटाळून लावली. 

या वाहकावर नात्यातील १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती बनवल्याचा आरोप आहे. डीएनए तपासणीत भ्रूण व बस वाहक यांचे रक्त नमुने जुळले नाहीत. त्यामुळे आरोपीने आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीडितेच्या आईने १९ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. बस वाहकाने मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे ती गर्भवती झाली, असा आरोप आहे. 

डीएनएचे नमुने जुळले नसतानाही खटला सुरू ठेवावा लागेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी याबाबत १५ सप्टेंबर रोजी निकाल दिला. डीएनए तपासणीतून आरोपी भ्रुणाचा जैविक पिता नव्हता हे स्पष्ट होत असले तरी याचिकाकर्त्याची लैंगिक गुन्ह्याच्या आरोपातून निर्दोष सुटका होऊ शकणार नाही. आरोपीने बळजबरी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा जबाब  जबाब फेटाळता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. 

आरोपीचा युक्तिवादडीएनए अहवाल प्रलंबित असताना पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले.  आरोपी आणि भ्रूण यांच्या रक्ताचे नमुने जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलगी गर्भवती होण्यास आपण जबाबदार नाही, असा युक्तिवाद करत केला होता.