शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महुआ मोईत्रांबाबत  दिवाळीनंतर हाेणार निर्णय, लाेकसभाध्यक्षांना समितीचा अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:03 IST

समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत, मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल मोईत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. स

नवी दिल्ली : लोकसभेच्या नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर यांनी तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरील समितीचा अहवाल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात सादर केला, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. दिवाळीनंतर बिर्ला त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत, मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याबद्दल मोईत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल बहुमताने स्वीकारला होता. समितीने अनैतिक वर्तन आणि सभागृहाचा अवमान केल्याबद्दल मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. बिर्ला  हे सध्या कोटा येथे आहेत आणि दिवाळीनंतर (१२ नोव्हेंबर) ते नवी दिल्लीत परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी या अहवालावर कारवाई करणे अपेक्षित आहे.

मी परत येईन, दुप्पट मताधिक्य घेऊन...हकालपट्टी करण्याची शिफारस केल्याच्या एका दिवसानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण दुप्पट मताधिक्य मिळवून परत येऊत, असे सांगत एक प्रकारे या प्रकरणामुळे आपल्याला फायदाच होईल, असे सुचवले असे मानले जाते. ‘संसदीय इतिहासात प्रथमच नैतिकता समितीने अनैतिकरीत्या हकालपट्टी केलेली व्यक्ती म्हणून आपली इतिहासात नोंद होईल याचा अभिमान वाटतो. नैतिकता समितीच्या आदेशात हकालपट्टीचा समावेश नाही. प्रथम हकालपट्टीची शिफारस केली आणि नंतर सरकारला सीबीआयला पुरावे शोधण्यास सांगितले,’ असे मोईत्रा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्रा