शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 17:28 IST

Wrong Number Love Story: मप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

रांची - झारखंडमधील पलामू जिल्ह्यामधून प्रेमप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मेदिनानगर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक तीन मुलांची आई राँग नंबरवरून आलेल्या फोननंतर प्रेमात पडली. या प्रेमाची नशा दिवसेंदिवस एवढी वाढत गेली की, तिने मुलं आणि पतीला सोडून पुढच्या जीवनात प्रियकरासोबत नवा संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

या महिलेच्या मोबाईलवर ऑक्टोबर महिन्यामध्ये राँग नंबरवरून एका तरुणाचा फोन आला होता. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दिवसागणिक हे बोलणं वाढत गेलं  आणि प्रेमही अधिक दृढ झालं. अखेरीस या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या संसारात काय सुरू आहे, याची साधी कुणकुणही पतीला लागली नव्हती. एकेदिवशी अचानक ही महिला गायब झाली. त्यामुळे चिंतेत पडलेल्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच माझ्या पतीला शोधा अशी विनवणी पोलिसांकडे केली.

त्यानंतर मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तपासास सुरुवात केली. खूप शोधाशोध केल्यावर एक आठवड्यापूर्वी सदर महिला ही चेन्नईमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या प्रियकराशी फोनवरून संपर्क साधून त्यांना पलामू येथे येण्यास सांगितले.  बुधवारी दोघेही मेदिनीनगर सदर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर या महिलेच्या पतीलाही बोलावण्यात आले. तोसुद्धा कुटुंबासह तिथे आला. तिथे पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहून त्याला धक्का बसला.

मेदिनीनगर सदर ठाण्याचे प्रभारी गौतम कुमार यांनी सांगितले की, सदर महिला ही तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर अडून बसली होती. मात्र तिचा पती तिला सोडण्यास तयार नव्हता. महिलेचा प्रियकर तिच्यासोबत राहण्यास तयार होता. अशा परिस्थितीत सर्वांच्या सहमतीने अखेर या महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले. तिचा हा प्रियकर चेन्नईमध्ये राहतो.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारJharkhandझारखंड