शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Video: मंदिरातले दागिने चोरले, देवाने तिथेच दिली शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:44 IST

दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने चोर मंदिरात शिरला, पण त्याला बाहेर पडता आले नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय.

श्रीकाकुलम: असे म्हणतात की, देव सर्व पाहत असतो. गुन्हे किंवा पाप करणाऱ्यांना देव योग्यवेळी शिक्षा देतो. असेच एक प्रकरण आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातून समोर आले आहे. मंदिरात चोरी करायला आलेल्या चोरट्याला देवाने जितल्या तिथे शिक्षा दिली. त्याला मिळालेल्या शिक्षेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?पापा राव(वय 30) असे चोरट्याचे नाव आहे. पापा राव याला दारुचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने येथील जामी येल्लम्मा(स्थानिक देवता) च्या मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मंदिराच्या मुख्य दाराला कुलूप लावले असल्याने त्याने भिंतीमध्ये एक छोटेसे भगदाड(खिडकी) पाडले. 

दागिने चोरल्यानंतर बाहेर पडता आले नाहीया भगडादातून त्याने मंदिरात प्रवेश केला. चोरट्याने मंदिरातून सूमारे 20 ग्रॅम चांदीचे दागिने चोरले. पण, त्याला मंदिरातून बाहेर पडता आले नाही. ज्या खिडकीतून तो आत शिरला होता, त्या खिडतीत तो अडकून पडला. यानंतर त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला असता स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्याला तशा विचित्र अवस्थेत पाहून लोकांना संपूर्ण प्रकार समजला.

व्हिडिओ झाला व्हायरलस्थानिकांनी त्याला कसेबसे त्या खिडकीतून बाहेर काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पापारावने दारुचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने यापूर्वी स्वतःच्याच घरातून एलपीजी सिलिंडर चोरुन विकला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशRobberyचोरीPoliceपोलिस