BSF Jawan: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका; धुक्यामुळे ओलांडली होती सीमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:35 PM2022-12-01T16:35:13+5:302022-12-01T16:36:48+5:30

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका करण्यात आली आहे.  

 A BSF jawan in Pakistan custody has been freed after crossing the border due to fog | BSF Jawan: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका; धुक्यामुळे ओलांडली होती सीमा

BSF Jawan: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या BSF जवानाची सुटका; धुक्यामुळे ओलांडली होती सीमा

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या एका बीएसएफ जवानाची सुटका झाली आहे. सकाळच्या धुक्यामुळे त्याने चुकून सीमा ओलांडली होती. बीएसएफने पाकिस्तानशी चर्चा केली आणि त्यानंतर जवानाची सुटका करण्यात आली आहे. खरं तर बीएसएफच्या एका जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. धुक्यामुळे बीएसएफ जवान चुकून शेजारी देशाच्या सीमेत गेला होता. त्यानंतर तातडीने बीएसएफ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर जवानाला सुखरूप परत आणण्यात आले.

धुक्यामुळे ओलांडली होती सीमा 

माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील अबोहर सेक्टरमध्ये बीएसएफ रेंजरने चुकून सीमा ओलांडली होती. त्यासाठी सकाळी 8 जवानांचे पथक शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. धुक्यामुळे एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आणि त्याला पार्क रेंजर्सनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीएसएफ आणि पाक रेंजर्सच्या अधिकाऱ्यांच्या फ्लॅग मीटिंगनंतर जवानाला परत देण्याचे मान्य करण्यात आले. याआधी देखील अनेक वेळा जवान चुकून पाकिस्तानच्या सीमेत घुसले आहेत. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तान त्यांना वेळेत सोडत नाही. मात्र यावेळी भारतीय रेंजरने आपल्या जवानाला सुखरूप परत आणले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title:  A BSF jawan in Pakistan custody has been freed after crossing the border due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.