नवी दिल्ली : उत्तर भारतासह शेजारील देशांमध्ये सध्या निसर्गाचा एक अत्यंत दुर्मीळ आणि अजब चमत्कार पाहायला मिळत आहे. पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,००० किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता अनुभवणाऱ्या कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे पश्चिमी चक्रावात किंवा विक्षोभ हे वक्राकार असतात. मात्र, यंदाचा हा कमी दाबाचा पट्टा एका सरळ रेषेत असून तो हजारो किलोमीटरपर्यंत पसरला आहे. अशा प्रकारची सरळ रचना अत्यंत दुर्मीळ मानली जाते. या रचनेमुळे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा यांसह तीव्र वादळी पावसाची निर्मिती होत आहे, ज्याचा अनुभव सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये येत आहे.
...म्हणून वेगळेपणपश्चिमी विक्षोभ साधारणपणे हिवाळ्याच्या काळात पश्चिम दिशेकडून पाऊस आणि बर्फवृष्टी घेऊन येतात. तथापि, ही हजारो किमी मार्गावर सरळ रेषेत पसरलेली नवी प्रणाली तिच्या वेगळ्या आकारामुळे आणि यंदा मार्चमध्येच तापलेल्या प्रदेशांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू शकते. एरवी वक्राकार असणारी ही प्रणाली इतक्या मोठ्या अंतरापर्यंत सरळ रेषेत असणे हे वातावरणातील 'जेट स्ट्रीम' मधील बदलांमुळे असू शकते. हवामान बदलाचा संकेतही मानण्यात येत आहे.
उकाड्यापासून सुटका; तापमानात मोठी घटकाही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. ऐन मार्चमध्येच उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, या चक्रावाताच्या आगमनामुळे तापमानात ३ ते ७ अंशांची मोठी घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे.
भारतीय हवामान खात्याचा इशारा या आगळ्यावेगळ्या विक्षोभाच्या परिणामी पडणारा पाऊस, वादळी वारे आणि विजेचा कडकडाट पाहता सावधगिरी बाळगावी, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्या-त्या वेळेनुसार हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे कळवण्यात आले आहे.
Web Summary : Unusual straight-line western disturbance brings rain from Afghanistan to India. This rare weather pattern has significantly lowered temperatures in North India, offering relief from the recent heatwave. Citizens are advised to take precautions due to potential thunderstorms and hail.
Web Summary : अफगानिस्तान से भारत तक एक असामान्य सीधी रेखा वाला पश्चिमी विक्षोभ बारिश लाया है। इस दुर्लभ मौसम पैटर्न ने उत्तरी भारत में तापमान को काफी कम कर दिया है, जिससे हाल ही में चल रही लू से राहत मिली है। नागरिकों को गरज और ओलावृष्टि की संभावना के कारण सावधानी बरतने की सलाह दी जाती है।