शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

30 वर्षीय महिलेचे 4 वयोवृद्ध व्यक्तींशी प्रेमसंबंध; पाचव्याने प्रपोज केले, मग भेटायला बोलावले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 20:59 IST

नालंदातील अस्थानन पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वृद्धाच्या हत्येचे गूढ समोर आले आहे.

नालंदा : नालंदातील अस्थानन पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वृद्धाच्या हत्येचे गूढ पोलिसांनी समोर आणले आहे. हत्येचा खुलासा पाहून सर्वांनाच धक्का बसला. या खून प्रकरणातील एकूण 5 आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. डीएसपी डॉ. शिबली नोमानी यांनी सांगितले की, 18/19 ऑक्‍टोबरच्या रात्री अस्थवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉलिटेक्निक कॉलेजजवळील नव्याने बांधलेल्या कम्युनिटी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. त्रिपित शर्मा (75 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती अस्तवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापर या गावातील रहिवाशी होती. याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा मिठू कुमार याने 21 ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येचा तपास स्थानिक पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.

डीएसपीने सांगितले की, पिनो देवी या 30 वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंधांमुळे ही हत्या करण्यात आली आहे. खरं तर पिनो देवी (30) ही महिला चहाचे दुकान चालवते. या महिलेच्या नवऱ्याचा आधीच मृत्यू झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे पिनो देवी या महिलेचे 4 वयोवृद्ध पुरूषांशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, ती त्रिपत शर्मा यांच्या देखील संपर्कात आली. त्रिपत शर्मा यांचा पिनो देवीसोबत काही कारणावरून वाद झाला. मग चिडलेल्या पिनो देवी या महिलेने त्रिपत शर्मा यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. तिने मृत्यू झालेल्या त्रिपत शर्मा यांना भेटण्यासाठी नव्याने बांधलेल्या कम्युनिटी हॉलमध्ये बोलावले होते. पिनो देवीने बोलावल्यानंतर त्रिताप शर्मा तिथे पोहोचल्यावर आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. नंतर ढकलून टॉयलेटच्या टाकीत टाकले. पोलिसांनी आरोपींकडून मृत त्रिपत शर्मा यांचा मोबाईलही जप्त केला आहे. 

पोलिसांनी 5 आरोपींना केली अटकआरोपींची सखोल चौकशी करण्यात येत असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पिनो देवी (30), कृष्णा नंदन प्रसाद अशा आरोपींचा समावेश आहे. याशिवाय अस्तवन पोलिस स्टेशन हद्दीतील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ राहणारा सूर्यमणी कुमार, मानपूर पोलिस स्टेशन हद्दीतील छबिलापूर गावचा रहिवासी वासुदेव पासवान आणि अस्तवन पोलिस स्टेशन हद्दीतील अकबरपूर गावचा रहिवासी बनारस प्रसाद उर्फ ​​लोहा सिंह यांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक