शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! प्रेयसीने फोन उचलला नाही; मग रागात 12वीतील मुलाने मेसेज करून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:38 IST

प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थिनीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

नवी दिल्ली : प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याने प्रेयसीसोबत चॅटिंग केली होती. याशिवाय त्याने सकाळी 4 वाजता त्याच्या दाजीला देखील मेसेज केला होता. त्यानंतर घरातून बाहेर पडून त्याने स्वत:वर गोळी झाडली. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर मोबाईल चॅटच्या माध्यमातून वास्तव समोर आले, त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून आत्महत्येप्रकरणी खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

12वीतील तरूणाने संपवलं जीवनखरं तर ही घटना अमरोरा पोलीस स्टेशन परिसरातील दादुपूर गावातील आहे. इथे शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि दोन मुले आहेत. तर दोन मुली विवाहित आहेत. लहान मुलगा जवळच्या गावातल्या शाळेत बारावीत शिकत होता. शुक्रवारी रात्री ते नातेवाईकांकडे जेवण करून झोपायला गेले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांच्या मुलाचा मृतदेह गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या जंगलात पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात प्रथमत: खळबळ उडाली.

एसपी आदित्य लंघे, एएसपी राजीव कुमार सिंग, सीओ अरुण कुमार आणि एसएचओ रमेश सेहरावतही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा करून श्वान पथकाला घटनास्थळी आणले. नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी मुलाचे कोणाशीही वैर नसल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी यापूर्वी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पण मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सपवरील चॅटिंगमुळे घटनेवरील पडदा हटला. प्रेमप्रकरणामुळे किशोरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

प्रेयसी रात्री फोन उचलत नव्हती चॅटिंगमध्ये तो रात्री अडीच वाजेपर्यंत प्रेयसीशी बोलत होता. रात्री प्रेयसी फोन उचलत नसल्यामुळे किशोरने तिला आत्महत्या करण्याचा मेसेज केला होता. तर पहाटे चार वाजता त्याने त्याच्या दाजीला देखील मेसेज करून मला माफ करा असे म्हटले होते. हे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी खुनाचा एफआयआर आत्महत्येत बदलला. एसओ रमेश सेहरावत यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून गोळी झाडून आत्महत्या केली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस