देशातील ९९ टक्के नेते दांभिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:11 IST2017-11-11T23:09:25+5:302017-11-11T23:11:25+5:30

देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे नेत्यांवर टीका केली. 

99% of the leaders in the country are hypocritical | देशातील ९९ टक्के नेते दांभिक 

देशातील ९९ टक्के नेते दांभिक 

ठळक मुद्दे रामदेवबाबा यांची टीका : संधी मिळेल तेव्हा या नेत्यांचा पर्दाफाश करू  


रोहटक : देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे नेत्यांवर टीका केली. 
येथे गुरुकुल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस नाही. देशातील ९९ टक्के राजकीय नेते दांभिक आहेत; पण मला संधी मिळेल तेव्हा या भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यात मला काहीच अडचण असणार नाही. 
स्वयंघोषित बाबा, देवाचा अवतार आणि हातावरून भविष्य सांगणारांपासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. जर असे बाबा तुमचे भविष्य सांगण्याचा दावा करीत असतील तर त्यांचे बूट लपवून ठेवा आणि ते कुठे आहेत हे त्यांना विचारा, असा चिमटाही त्यांनी काढला. ज्यांना स्वत:चे भविष्य माहीत नाही ते तुमचे भविष्य सांगून पैसे कमावतात, असेही ते म्हणाले.       
जर लोकांकडे वैज्ञानिक वैचारिकता नसेल तर, रामरहीमसारखे बाबा लोकांना मुर्खात काढत राहतील. रामरहीम आणि आसाराम बापू यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, जर लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा असे वाटत असेल तर, एका संताने संतासारखे राहावे, असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळात काही बाबांवर अनेक आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी अशा बाबांचा आज समाचार घेतला. हरियाणा सरकारने रामदेवबाबा यांना आयुर्वेद आणि योग यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविले आहे. 
 

Web Title: 99% of the leaders in the country are hypocritical