शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:36 IST

तब्बल ७० वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर ९५ वर्षांच्या आजोबांना आपल्या ९० वर्षांच्या सहचारिणीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली.

सध्या जोडप्यांमध्ये लिव्हइन रिलेशनशिपचा ट्रेंड चांगलाच वाढत आहे. काही वर्ष एकमेकांसोबत राहून पटलं तर लग्नाचा निर्णय घेणं, आणि नाहीच पटलं तर परस्पर संमतीने वेगळं होणं, हा या नात्याचा उद्देश असतो. मात्र, आता लिव्हइन रिलेशनशिपचं एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. तब्बल ७० वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर ९५ वर्षांच्या आजोबांना आपल्या ९० वर्षांच्या सहचारिणीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. दोघांची ही इच्छा त्यांच्या कुटुंबाने पूर्ण केली आहे.

राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यातील गलांदर गावात हा विलक्षण विवाह सोहळा पार पडला आहे. या लग्नाची खासियत म्हणजे वर आणि वधूचं वय अनुक्रमे ९५ आणि ९० वर्षे आहे. 

७० वर्षांपासून होते लिव्ह-इनमध्ये!

गलांदर गावातील काली डोना येथील रामाभाई अंगारी आणि जीवली देवी तब्बल सात दशकांपासून एकत्र राहत होते. त्यांच्या सहजीवनातून त्यांना सहा अपत्ये झाली असून, आज त्यांच्या घरात नातवंडांचाही गोंगाट आहे. त्यांची चारही मुले सरकारी नोकरीत आहेत. यातील दोन शिक्षक, एक नर्स आणि एक मुलगी सरकारी सेवेत आहे.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर घेतला मोठा निर्णय

वृद्धापकाळात, आयुष्याच्या अंतिम पर्वात, या जोडप्याने आपल्या मुलांकडे इच्छा व्यक्त केली की, "आम्ही आजवर लग्न केले नाही, पण आम्हाला आता आमच्या आयुष्यातील हा टप्पाही पार करायचा आहे." आई-वडिलांच्या या भावना ओळखून त्यांच्या मुलांनी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात विवाहसोहळ्याचं आयोजन केलं.

डीजेवर नाच, गावकऱ्यांना मेजवानी!

बुधवारी पार पडलेल्या या लग्नात डीजेवर पारंपरिक धून वाजवण्यात आल्या, गावकऱ्यांनी उत्साहात डान्स केला, आणि संपूर्ण गाव या अनोख्या विवाहाला उपस्थित राहिला. रामाभाई आणि जीवली देवी यांनी विधीवत सात फेरे घेतले आणि पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. मुलांनी गावकऱ्यांसाठी खास मेजवानीचे आयोजनही केले.

संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेणारा विवाह

रामाभाई आणि जीवली देवी यांचे सर्व मुलगे आणि मुली – बाकू अंगारी (६०), शिवराम अंगारी (५५), कांतिलाल (५२), लक्ष्मण (४२), सूना सुनीता आणि अनिता यांनी या समारंभात विशेष सहभाग घेतला. या प्रसंगी दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक स्पष्ट दिसत होती.

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्marriageलग्नJara hatkeजरा हटके