'एनआरआय' मतदारांच्या यादीत 92 टक्के केरळचे रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:22 IST2019-03-14T18:21:31+5:302019-03-14T18:22:01+5:30
अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदारांची संख्या जवळपास 71 हजार 735 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये 66 हजार 584 मतदार फक्त केरळमध्ये राहणारे आहेत.

'एनआरआय' मतदारांच्या यादीत 92 टक्के केरळचे रहिवासी
कोझीकोड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करताना दिसत आहेत. यातच, मल्ल्याळी भाषिक लोकांचा राजकारणाशी चांगला संपर्क आहे. जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात मल्ल्याळी व्यक्ती राहत असला, तरी मतदानासाठी भारतात येतच असतो.
अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदारांची संख्या जवळपास 71 हजार 735 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये 66 हजार 584 मतदार फक्त केरळमध्ये राहणारे आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एनआरआय मतदारांची संख्या पाच पटीने वाढली आहे. 2014 मध्ये हा आकडा 12 हजार 653 इतका होता.
दरम्यान, भारतात एनआरआय लोकसंख्या जवळपास 1 कोटी 30 लाख आहे. यामधील 71 हजार 735 लोकांनी मतदान नोंदणी केली आहे. यात 92 टक्के मतदार केरळमधील रहिवाशी आहेत. केरळमध्ये 66 हजार 584 मतदारांमध्ये 3,729 महिला आहेत.