शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 24 तासांत 911 रुग्णांचा मृत्यू; लसीकरण 36 कोटींवर, ४३,२९३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:40 IST

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. 

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४३,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९११ रुग्णांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने काळजी निर्माण झाली आहे. देशव्यापी मोहिमेत ३६.८९ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. 

लसीच्या तिसऱ्या डोससाठी फायझर-बायोएनटेक परवानगी मागणार - कोरोना विषाणूच्या मूळ स्ट्रेनवर अधिक परिणामकारक ठरण्यासाठी फायझर-बायोएनटेक कोविड-१९ लस  ‘कोमिरनॅटी’ची तिसरी मात्रा गरजेची ठरू शकते, असे वृत्त शुक्रवारी प्रसार माध्यमांनी कंपन्यांच्या निवेदनाच्या आधारे दिले. दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा समोर आलेला बेटा व्हेरिएंट आणि भारतात सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासूनही कोविड-१९ लसीची तिसरी मात्रा चांगले संरक्षण देईल, असे सध्या लसीच्या सुरू असलेल्या चाचणीच्या तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अपेक्षित आहे. सार्स-कोव्ह-२ विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटवर लस कमी परिणामकारक असल्याचे सांगितले गेल्यानंतर या घडामोडी घडल्या. 

-     हंगामी चाचणीच्या माहितीने तिसरी मात्रा ही त्याच कोरोना विषाणूंच्या व्हेरिएंटशी लढताना अँटिबॉडीची पातळी पाच ते दहा पटींनी (पहिल्या दोन मात्रांच्या तुलनेत) वाढवते, असे दाखविल्यामुळे फायझर आणि बायोएनटेकने आमच्या कोविड-१९ लसीच्या तिसऱ्या मात्रेला नियामक मान्यता मागत आहोत, असे गुरुवारी जाहीर केले. -     या पार्श्वभूमीवर लसीच्या पहिल्या दोन मात्रा घेतल्याच्या तुलनेत चांगले संरक्षण मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

लाम्बडा विषाणू भारतात नाही-     देशात कोरोनाच्या लाम्बडा या विषाणूचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाम्बडा विषाणू जगातील तीस देशांमध्ये पसरला आहे. त्यात भारताचा समावेश नाही.-     पेरू या देशातून लाम्बडा विषाणूचा उगम झाला. त्या देशामध्ये दर एक लाख लोकांमागे ५८७ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. -     लाम्बडा विषाणूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकतेच जाहीर केले होते. कोरोनाच्या मूळ विषाणूपेक्षा लाम्बडाचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतdoctorडॉक्टर