शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

संसदेतील कामकाजात ९ खासदार 'खामोश'; शत्रुघ्न सिन्हा अन् सनी देओलचेही मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:58 IST

संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही. 

नवी दिल्ली - देशाची संसद म्हणजे देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हटलं जातं. ६ ते ७ लाख लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन खासदार संसदेत पोहोचतात. आपल्या भागातील, आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडतात. अर्थातच, खासदारांच्या या कामगिराचाही लेखाजोखा ठेवण्यात येतो. मात्र, संसदेतील याच अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही. 

आपल्या दमदार डायलॉगमुळे देशभर आणि पाकिस्तानतही प्रसिद्ध असलेला अभिनेता सनी देओलचाही या न बोलणाऱ्या खासदारांच्या यादीत समावेश आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आला. संसदेतील ५४३ खासदारांपैकी न बोलणाऱ्या खासदारांमध्ये ९ जणांचा समवेश असून माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा हेही 'खामोश'च दिसून आले. 

संसदेतील कामकाजावेळी एकही शब्द न बोलणाऱ्या नेत्यांमध्ये प. बंगालचे टीएमसी खासदार दिब्येंदू अधिकारी, कर्नाटकचे भाजपा खासदार व माजी मंत्री अनंत कुमार हेगडे, भाजपा खासदार श्रीनिवास प्रसाद आणि भाजपा खासदार बीएन बचे गौडा यांचा समावेश आहे. तसेच, पंजाबमधून भाजपा खासदार सनी देओल, आसामचे भाजपा खासदार प्रदान बरुआ हेही याच यादीत आहेत. 

या खासदारांनी गत ५ वर्षात संसदेतील कुठल्याही चर्चेत सहभाग घेतला नाही. यापैकी काहींनी लिखीत स्वरुपात आपली उपस्थिती दर्शवली आहे. मात्र, शत्रुघ्न सिन्हा हे लिखीत स्वरुपातही ससंदीय कामकाजात सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, वरील खासदारांपैकी तीन खासदार असेही आहेत, ज्यांनी लिखीत किंवा मौखिक अशा कुठल्याही प्रकारात आपला सहभाग नोंदवला नाही. भाजपा सोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झालेल शत्रुघ्न सिन्हा, युपीतून भाजपा खासदार अतुल राय आणि कर्नाटकातून भाजपा खासदार व माजी राज्यमंत्री रमेश सी जिगजिगानी यांचाही समावेश आहे.  

टॅग्स :Sunny Deolसनी देओलBJPभाजपाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाMember of parliamentखासदार