शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

9 आमदारांनी सोडली भाजपाची साथ; 'या' राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:32 IST

2017 मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यीय विधानसभेत 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

मणिपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर सहा आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. 

राष्ट्रीय जन पक्षाचे चार, तृणमूल काँग्रेस एक आणि एका अपक्षाने पाठिंबा काढत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुभाषचंद्र सिंह, टीटी होईकीप आणि सॅम्युअल जेंदेई या तीन भाजप आमदारांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. 

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?; हल्ल्यातील जखमी जवानानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

9 आमदारांनी साथ सोडल्यानंतर बिरेन सिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. तसेच आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री ओक्रम इबोदी सिंग हे मणिपूरचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असा दावा देखील काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

2017 मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यीय विधानसभेत 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. परंतु भाजपला चार एनपीपी, चार एनपीएफ, एक लोजप, एक तृणमूल, एक अपक्ष आणि एक कॉंग्रेस बंडखोर अशा 12 जणांचा पाठिंबा मिळवून बहुमत गाठता आले. बिरेनसिंग सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे अन्य सात आमदारही सामील झाले होते. 

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

दरम्यान, मणिपूरमध्ये 19 जूनला राज्यसभा निवडणूका होत आहे. नुकतंच मणिपूर हायकोर्टाने काँग्रेस सोडलेल्या 7 आमदारांना मतदानासाठी विधानसभेत जाण्यापासून रोखलं होतं. पुढील आदेश येईपर्यंत या आमदारांना विधानसभेत जाता येणार नाही, असं कोर्टाने म्हटल होतं. यापूर्वी मार्चमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मंत्री असलेल्या एका आमदाराने राजीनामा दिला होता.

टॅग्स :Manipur State Congress Partyमणिपूर स्टेट काँग्रेस पार्टीElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा