शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

आंध्र प्रदेशातील मंदिरात भक्तांमधील घबराटीमुळे चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:26 IST

कासीबुग्गाच्या वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या घटनेत मृतांमध्ये ८ महिला, अल्पवयीन मुलाचा समावेश

कासीबुग्गा: आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा येथे शनिवारी वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

श्रीकाकुलम जिल्हाधिकारी स्वप्निल पुंडकर यांनी यापूर्वी मृतांचा आकडा दहा असल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ वर्षे वयाचा  मुलगा व आठ महिलांचा मृत्यू झाला. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेंकटेश्वराचे मंदिर खासगी असून ते नुकतेच बांधण्यात आले आहे. मात्र श्रीकाकुलम जिल्हा पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी चेंगराचेंगरीतून ही दुर्घटना झाली नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मंदिराच्या पायऱ्यांजवळील लोखंडी रेलिंग कोसळल्यामुळे भक्तांमध्ये घबराट पसरली. त्यातील काही जण खाली पडले. त्यांच्या अंगावर काही लोक पडले. त्यातून नऊ जणांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. रेड्डी म्हणाले की, वेंकटेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली.

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत

वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

ते म्हणाले की, श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना वेदनादायी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

मंदिरात कार्यक्रमाकरिता पोलिस बंदोबस्तासाठी व्यवस्थापनाने अर्जही केलेला नव्हता व परवानगीही घेतलेली नव्हती, असे श्रीकाकुलम पोलिसांनी सांगितले. २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील तीन प्रमुख मंदिरांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० जण जखमी झाले. जानेवारीत तिरुपतीमधील बैरागी पट्टाडा येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता.

कार्तिक मास, एकादशीमुळे भाविकांची वाढली गर्दी

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी सांगितले की, सदर मंदिरात दर्शनासाठी भक्त जात असताना रेलिंग तुटले आणि काही लोक खाली पडले. त्यांच्या अंगावर इतर लोक पडले. मंदिरात प्रत्येक शनिवारी दीड ते दोन हजार भक्त दर्शनासाठी येतात. कार्तिक मास व एकादशी एकाच तसेच शनिवारी आल्यामुळे मोठ्या संख्येने भक्त मंदिरात जमले आणि त्यातून ही दुर्घटना घडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Andhra Pradesh temple stampede kills nine devotees amid panic.

Web Summary : A stampede at a Venkateswara temple in Andhra Pradesh's Srikakulam district killed nine people, including eight women and a child. Panic erupted after a railing collapsed near the temple stairs. Financial aid has been announced for the victims' families.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश