शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

०९... गुन्हे

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

चोरट्यास अटक

चोरट्यास अटक
काटोल : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा शिवारातील शेतातून शेतीपयोगी साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यास काटोल पोलिसांनी अटक केली.
उमेश पांडुरंग वाघाडे (३०, रा. रिधोरा, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. रिधोरा शिवारात फिर्यादी दुनेश्वर शंकर जवंजाळ (५२, रा. रिधोरा, ता. काटोल) यांची शेती आहे. उमेशने बुधवारी मध्यरात्री त्यांच्या शेतातील २४ नग पितळी नोझल चोरून नेले होते. या नोझलची किंमत ९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.
***
खापरखेड्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरी
खापरखेडा : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी हात साफ करीत १९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
अज्ञात चोरट्यांनी खापरखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यात चोरट्यांनी दवाखान्यातील कॅमेरा, कूलर, स्टोव्हसह इतर साहित्य चोरून नेले. या साहित्याची किंमत १९ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास सहायक फौजदार रामअसारे मिश्रा करीत आहे.
***
शेतीपयोगी साहित्य लंपास
नरखेड : शेतातील शेतीपयोगी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर शिवारात रविवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी नत्थू तुळशीराम गेडाम (५५, रा. भिष्णूर, ता. नरखेड) यांची भिष्णूर शिवारात शेती आहे. चोरट्यांनी त्यांच्या शेतातील मोटरपंप, स्टार्टर व पाईप असा एकूण १४ हजार ५०० किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***