85 वर्षीय व्यक्ती घरात बसून अचानक झाला श्रीमंत, फक्त एका आयडीयानं बदललं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:33 IST2021-08-19T15:20:12+5:302021-08-19T15:33:35+5:30
Viral Story: 85 वर्षीय वृद्धानं आपल्या पत्नीसोबत मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे.

85 वर्षीय व्यक्ती घरात बसून अचानक झाला श्रीमंत, फक्त एका आयडीयानं बदललं नशीब
तुम्हाला आयुष्याती सर्व टेंशन विसरुन चेहऱ्यावर आनंद आणणारा व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल, तर एका वृद्ध जोडप्याची ही क्लिप तुमच्यासाठीच आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका 85 वर्षीय व्यक्तीने कसा आपल्या पत्नीसोबत मिळून केसांच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात मोठं यश मिळवलं, हे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.
वृद्धानं वयाच्या 85 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेने व्हिडिओसह शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ही सर्वात खास भागीदारी आहे.' या व्हिडिओमध्ये टेक्स्ट मेसेजद्वारे सांगितले की, या वृद्ध व्यक्तीनं वयाच्या 85 व्या वर्षी आपला व्यवसाय कसा सुरू केला. व्हिडिओत बेनी दयाल आणि सलीम मर्चंट यांनी गायलेल्या 'बँड बाजा बारात' चित्रपटातील 'तरकीबें' गाणे देखील आहे.
पत्नी सुद्धा सोबत काम करते
हा व्हिडिओ एका दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट केल्यापासून, व्हिडिओला 1.4 लाखांहून अधिक लाइक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट् करत त्या जोडप्याचं समर्थन केलं आहे. एका इन्स्टाग्राम युझरने लिहिलं, 'हे खूप गोंडस आणि प्रेरणादायी आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'किती प्रेरणादायी व्हिडिओ आहे! खूप छान आहे! '