धक्कादायक! कर्नाटकात मजुरांनी व्हीव्हीपॅटमध्ये ठेवले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 10:15 IST2018-05-21T10:15:58+5:302018-05-21T10:15:58+5:30

धक्कादायक! कर्नाटकात मजुरांनी व्हीव्हीपॅटमध्ये ठेवले कपडे
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणूक, निकाल त्यानंतरची त्रिशंकु विधानसभा असं अनेक प्रकारचं राजकीय नाट्य संपूर्ण देशाने पाहिलं. अनेक राजकीय खेळींनंतर आता कुमारस्वामी देवेगौडा सत्ता स्थापन करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनवर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. याच घडामोडीत आता व्हीव्हीपॅटबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील एका मजुराच्या घरात ८ व्हीव्हीपॅटचे कव्हर्स आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या कव्हर्सचा वापर हे मजूर कपडे ठेवण्यासाठी करत होते. याबाबत पुढील तपास सुरू आहे. मजुराच्या घरी सापडलेल्या मशीन नसून व्हीव्हीपॅटचे ते कव्हर असल्याचं पोलिसांनी म्हटलं. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या व्हीव्हीपॅटला बॅटरी नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
नुकतंच कर्नाटक विधानसभेसाठी मतदान झालं. निवडणुकीत भाजपाने 104 जागा मिळविल्या. 104 जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. इतकंच नाही, तर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. पण येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्रीपद फक्त अडीच दिवस राहिलं. सुप्रीम कोर्टाने बहुमच चाचणीचे आदेश दिल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात येडियुरप्पा अयशस्वी ठरले.
दरम्यान, आता आता बुधवारी जेडीएस आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार सत्तेवर येईल. कुमारस्वामी देवेगौडा हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसला ७८ तर जेडीएसला ३७ जागा मिळाल्या आहेत.