'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:10 PM2022-10-12T19:10:31+5:302022-10-12T19:11:38+5:30

7th pay commission : ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

7th pay commission news chattisgarh government give 5th arrear money with salary | 'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी 

'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी 

Next

नवी दिल्ली :  केंद्र सरकार (Central Governmnet) व्यतिरिक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट आहे. यावेळी दिवाळीपूर्वी सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता जाहीर केला आहे. दरम्यान, या 5 व्या हप्त्याच्या स्वरूपात जानेवारी 2017 ते मार्च 2017 पर्यंतच्या सॅलरीचे पेमेंट दिले जाईल.

हा मोठा निर्णय छत्तीसगड सरकारने घेतला आहे. ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी, छत्तीसगड सरकारने डिसेंबर 2021 मध्ये चौथा हप्ता देण्याचे आदेश दिले होते. वित्त विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकबाकीचे पैसे मिळतील. हे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.

6 टक्के वाढू शकतो महागाई भत्ता
राज्य सरकारने जारी केलेल्या या हप्त्याचा राज्यातील जवळपास 3.80 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्य सरकार लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत 6 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक 17 ऑक्टोबरला होऊ शकते
17 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महागाई भत्त्याव्यतिरिक्त एचआरएबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: 7th pay commission news chattisgarh government give 5th arrear money with salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.