शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये गेल्या वर्षी ७९ टक्के वाढ वेळीच निपटारा : केंद्रीय दक्षता आयोगाची माहिती

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती.

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती.
गेल्या वर्षी आयोगाकडे भ्रष्टाचारासंबंधी आलेल्या तक्रारींचा उच्चांक नोंदला गेला होता. या सर्व तक्रारींचा निर्धारित मुदतीत निपटारा करण्यात आला. या तक्रारी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित होत्या. गेल्या वर्षी सीव्हीसीने दरमहा तयार केलेल्या अहवालाच्या आधारावर ही संख्या निश्चित करण्यात आली. सीव्हीसीच्या वार्षिक अहवालात अंतिम आकडेवारी दिली जात असून, दरवर्षी जूनमध्ये ती संसदेत सादर केल्यानंतर सार्वजनिक केली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
----------
ठोस पुराव्यांचा अभाव
बहुतांश तक्रारी ठोस पुराव्यांअभावी निकाली काढण्यात आल्या. भ्रष्टाचार संपविण्याच्या धोरणानुसार या तक्रारींची नोंद करण्यात आली. उर्वरित तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी, तसेच त्यासंबंधी अहवालासाठी संबंधित मंत्रालयाच्या मुख्य दक्षता अधिकार्‍याकडे सोपविण्यात आल्या, असे सीव्हीसीच्या एका अधिकार्‍याने सांगितले.
--------
वर्ष आणि तक्रारींची संख्या...
२०१२- ३७,०३९
२०११-१६,९२९
२०१०- १६,२६०
२००९-१४,२०६
२००८- १०,१४२
२००७-११,०६२
२००६- १०,७९८
२००५-९,३२०
२००४-१०,७३५
२००३-११,३९७