शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या तक्रारींमध्ये गेल्यावर्षी ७९ टक्के वाढ वेळीच निपटारा : केंद्रीय दक्षता आयोगाची माहिती

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे(सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती.

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाकडे(सीव्हीसी) २०१४ मध्ये भ्रष्टाचारासंबंधी ६३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्या असून, त्याआधीच्या वर्षाच्या म्हणजे २०१३ च्या तुलनेत ही संख्या ७९ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी आयोगाकडे ६३,२८८ तक्रारी आल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या ३५,३३२ एवढी होती.
गेल्यावर्षी आयोगाकडे भ्रष्टाचारासंबंधी आलेल्या तक्रारींचा उच्चांक नोंदला गेला होता. या सर्व तक्रारींचा निर्धारित मुदतीत निपटारा करण्यात आला. या तक्रारी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित होत्या. गेल्यावर्षी सीव्हीसीने दरमहा तयार केलेल्या अहवालाच्या आधारावर ही संख्या निश्चित करण्यात आली. सीव्हीसीच्या वार्षिक अहवालात अंतिम आकडेवारी दिली जात असून, दरवर्षी जूनमध्ये ती संसदेत सादर केल्यानंतर सार्वजनिक केली जाते.
----------
ठोस पुराव्यांचा अभाव
बहुतांश तक्रारी ठोस पुराव्यांच्या अभावी निकाली काढण्यात आल्या. भ्रष्टाचार संपविण्याच्या धोरणानुसार या तक्रारींची नोंद करण्यात आली. उर्वरित तक्रारी आवश्यक कार्यवाहीसाठी तसेच त्यासंबंधी अहवालासाठी संबंधित मंत्रालयाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्या, असे सीव्हीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
--------
वर्ष आणि तक्रारींची संख्या...
२०१२- ३७,०३९
२०११-१६,९२९
२०१०- १६,२६०
२००९-१४,२०६
२००८- १०,१४२
२००७-११,०६२
२००६- १०,७९८
२००५-९,३२०
२००४-१०,७३५
२००३-११,३९७