बिदरजवळ पकडला ७०० किलोग्रॅम गांजा

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30

बिदर : हैदराबादहून मुंबईकडे निघालेल्या एका ट्रकमधून गांजाची तस्करी सुरु असताना शनिवारी दुपारी बिदर पोलिसांनी कारवाई केली़ त्यात ट्रकमधील ७०० किलो गांजा जप्त करण्यात आला़

700kg hemp caught near Bidar | बिदरजवळ पकडला ७०० किलोग्रॅम गांजा

बिदरजवळ पकडला ७०० किलोग्रॅम गांजा

दर : हैदराबादहून मुंबईकडे निघालेल्या एका ट्रकमधून गांजाची तस्करी सुरु असताना शनिवारी दुपारी बिदर पोलिसांनी कारवाई केली़ त्यात ट्रकमधील ७०० किलो गांजा जप्त करण्यात आला़
हैदराबाद येथून बारदाणा भरुन मुंबईकडे निघालेल्या एपी ०५, टीबी- ६९९८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये बारदाण्याच्या मधोमध गांजा भरल्याची माहिती बिदर पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी दुपारी बिदरजवळील शिरसी औराद गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला़ यावेळी ट्रकची झडती घेतली असता त्यात २१ पोत्यांमध्ये ७०० किलोग्रॅम गांजा भरल्याचे आढळून आले़ पोलिसांना पाहताच ट्रकचालक पळून गेला़ त्यामुळे पोलिसांनी ट्रक व गांजा ताब्यात घेऊन सायंकाळी बगदल पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे़ या तस्करीमागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक सुधीरकुमार रेड्डी यांनी सांगितले़

Web Title: 700kg hemp caught near Bidar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.