70% wore masks; Infection can be avoided | ७० टक्के लोकांनी मास्क लावला; तर टळू शकेल संसर्ग

७० टक्के लोकांनी मास्क लावला; तर टळू शकेल संसर्ग

ठळक मुद्देया संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते.

नवी दिल्ली : ७० टक्के लोकांनी सातत्याने मास्क लावला तर संसर्ग टळून साथीला रोखता येईल, असे एका संशोधनातून आढळले आहे. त्याबद्दल फिजिक्स ऑफ फ्लूइड या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

या संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते. अशा प्रकारचे मास्क ७० टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी सातत्याने घातले तरी कोरोनाची साथ रोखता येईल. कापडापासून बनविलेले मास्क जर सातत्याने वापरले तर कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी करता येतो. माणूस जेव्हा बोलतो, गातो, शिंकतो, खोकतो किंवा श्वास घेतो त्यावेळी त्याच्या नाक व तोंडातून शिंतोडे उडत असतात. त्यातून होणाºया संसर्गाला रोखण्याचे काम मास्क करतो. या कामी हायब्रीड पॉलिमरपासून बनविलेले मास्क अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 70% wore masks; Infection can be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.