शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

कन्हैयाकुमारसाठी लोकवर्गणीतून ७0 लाख जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:53 AM

नाना पटोले, राजू शेट्टी, राघव चड्डा यांच्यासह १४ उमेदवारांना निधीसाठी लोकांची मदत

नवी दिल्ली : निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी अनेक उमेदवारांनी पक्षाशिवाय आॅनलाइन देणग्यांचाही आधार घेतला आहे. बिहारच्या बेुगसरायमधील भाकपचे उमेदवार कन्हैयाकुमार त्यात आघाडीवर आहेत. देशभरातील सुमारे १४ उमेदवार लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवित आहेत.

आम आदमी पक्षाचे दिल्लीतील उमेदवार राघव चड्डा व पश्चिम बंगालच्या रायगंजमधील मोहम्मद सलीम यांचाही लोकवर्गणीवर भर आहे. नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले, हातकणंगलेमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, मुंबईतील तृतीयपंथीय उमेदवार स्नेहा काळे हेही लोकवर्गणी जमा करत आहेत. ते पारदर्शकता जपण्याचाही संदेश देत आहेत.

आॅनलाइन क्राउड फंडिंगचे हे तंत्र युरोपात सर्वप्रथम उपयोगात आले. मणिपूर विधानसभेच्या २0१७च्या निवडणुकीत अफस्पा कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी साडेचार लाख रुपये जमा केले होते.कन्हैयाकुमारला आतापर्यंत ५,५00 लोकांकडून ७0 लाख रुपये मिळाले आहेत. पूर्व दिल्लीच्या आपचे उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या नावे ५0 लाख रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत.

राजू शेट्टी यांच्याकडे ३५ लाख रुपये जमा झाले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम यांनाही आॅनलाइन देणग्यांमधून १ लाख ४0 हजार रुपये मिळाले आहेत. आपचे पटियाळातील उमेदवार धर्मवीर व गोव्यातील एल्विस गोम्स, बसपचे एसएच बुखारी, कम्युनिस्ट पक्षाचे माले येथील उमेदवार राजू यादव हेही लोकवर्गणीवर अवलंबून आहेत.४0 उमेदवारांसाठी देणग्याअवरडेमॉक्रसीडॉटइन या आॅनलाइन देणग्या जमा करणाऱ्या संकेतस्थळाने यंदा ४0 उमेदवारांसाठी काम सुरू केले आहे. हे संकेतस्थळ जमा देणग्यांतील रकमेचा पाच टक्के भाग कापून घेऊन उर्वरित रक्कम उमेदवाराकडे सुपुर्द करतात.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार