शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

७ वर्षांनी दाखल गुन्ह्यात १० वर्षे शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:43 AM

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; निर्दोष असल्याचा आरोपींचा कांगावा

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : २००३ मध्ये पहिलीत असलेल्या एका मुलीवर शिलाँग येथे राहणाऱ्या नातेवाईकाने बलात्कार केला होता व याबद्दलचा गुन्हा २०१० मध्ये दाखल झाला. आरोपीने त्याला यात गोवण्यात येत असून, ७ वर्षांचा विलंब हे एकच कारण त्याला निर्दोष सोडण्यात पुरेसे असल्याचा कांगावा केला. मात्र, मेघालय उच्च न्यायालयाने आरोपीच्या अमानवी कृत्याची पशूंनाही लाज वाटेल, अशा शब्दांत सुनावत १० वर्षांची सक्तमजुरी ठोठावली.२००३ मध्ये संबंधित मुलीला एक दिवस तिच्या शेजारी राहणाºया नातेवाईकाने शाळेतून आणले. टेलिफोन खात्यात इंजिनिअर असणाºया या नातेवाईकाने घरी कोणीही नाही याचा फायदा घेऊन स्वत:च्या घरात नेले आणि बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर मारून टाकण्याची चाकू दाखवून धमकी दिली.यानंतर मुलगी वारंवार आजारी पडू लागली. तिचे वय वाढल्यानंतर टी.व्ही.वरील मालिकांमधून तिला आपल्यासोबत लहानपणी नेमके काय घडले होते हे समजले. ती सतत आजारी पडते म्हणून २०१० मध्ये तिच्या एका शिक्षिकेने तिचे समुपदेशन केले असता, मुलीने ही घटना सांगितली. शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून हे सांगितले. यानंतर मुलीला दवाखान्यात उपचार करून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.७ वर्षांनंतर दाखल गुन्ह्यात सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा दिली. याविरुद्ध आरोपीने मेघालय उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलात आरोपीचा ७ वर्षांनंतर गुन्हा दाखल असल्याने तो जाणूनबुजून त्याला गोवण्यासाठी दाखल केल्याचा मुद्दा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. ७ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार करणारा अमानवीच आहे. पशूंनाही याची लाज वाटेल, अशी उच्च न्यायालयाने कठोर टीका करीत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायम केली.बलात्कारानंतर मुलीचे सततचे आजारपण याकडे कुटुंबियांचे दुर्लक्ष; पण शिक्षिकेसमोर मुलीने मुक्तपणे सांगितली घटना.वय वाढल्यानंतर मुलीला काय घडले हे समजले. ३ वेळा तिचा आत्महत्येचा प्रयत्न. तरीही कारणांचा शोध घेण्यात कुटुंबीय अपयशी.कुटुंबातील मुक्त संवादाच्या अभावामुळे मुलीने ७ वर्षे भोगल्या यातना.

टॅग्स :Rapeबलात्कारHigh Courtउच्च न्यायालय