शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:06 IST

जनजीवन विस्कळीत; ६ जिल्ह्यांना तडाखा.

गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून नऊ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गुजरातमधील काही भागांत आगामी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.. गुजरातमधील छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी, पंचमहाल या सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुजरातमधील ९ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. अहमदाबाद, नवसारी, नडियाद आदी शहरांमध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. 

मध्य प्रदेशात वीज कोसळून ३ ठारमध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यातील सेमाढाना गावामध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी वीज कोसळून तीन मजूर ठार झाले. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. सेमाढाना गावामध्ये एका इमारतीचे काम करत असताना तिथे वीज कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्य प्रदेशात भोपाळसहित इतर ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तसेच भोपाळ विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. कोटा, बारां, झालावाड, बूंदी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांची जलपातळी वाढली आहे, गेल्या २४ तासांत बूंदी, सीकर, धौलपूर, भिलवाडा जिल्ह्यांतील ५ ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. सगळ्यात जास्त पाऊसमान भिलवाडा जिल्ह्यामध्ये आहे.

केरळच्या चार जिल्ह्यांमध्ये संततधारकेरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र यांना मुसळधार पावसाबाबत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. केरळमधील कोडिकोळ, वायनाडसह चार जिल्ह्यांमध्ये आगामी २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बिहारमधील ३० जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GujaratगुजरातRainपाऊस