वैष्णोदेवीच्या दिशेने जाणारे हेलिकॉप्टर कोसळून ७ ठार
By Admin | Updated: November 23, 2015 13:42 IST2015-11-23T13:42:33+5:302015-11-23T13:42:53+5:30
कटरा सांझी येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारे हेलिकॉप्टर आग लागून कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली.

वैष्णोदेवीच्या दिशेने जाणारे हेलिकॉप्टर कोसळून ७ ठार
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २३ - कटरा सांझी येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणारे हेलिकॉप्टर आग लागून कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. मृतांमध्ये सहा भाविकांसह महिला पायलटचाही समावेश आहे.
कटरा सांझी येथून वैष्णोदेवीच्या दिशेने जाणा-या हिमालयन कंपनीच्या या हेलिकॉप्टरला सोमवारी दुपारी उड्डाण करताच अचानक आग लागली आणि ते खाली कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी व पायलट जागीच ठार झाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.