शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता STF करेल तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 12:18 IST

Lakhimpur Khiri Violence: या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये रविवारी सायंकाळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे वाहन शेतकरी आंदोलनात घुसल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंत उत्तर प्रदेशातात वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आता या प्रकरणाचा तपास एसटीएफ वर्ग करण्यात आलाय. 

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हामिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफ सोमवारी संध्याकाळपासूनच तपासाची सूत्रे हाती घेईल. दुसरीकडे, हिंसाचारानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन पोलिसांनी 24 जणांची ओळख पटवली आहे. यासोबतच पोलीसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. यापूर्वी, या प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आणि बंडखोरीसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नुकसान भरपाईची मागणीदरम्यान, या घटनेनंतर लखीमपूर जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय.

अनेक नेते पोलिसांच्या ताब्यातया प्रकरणानंतर लखीमपूर खीरी पासून लखनऊपर्यंत अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही शिगेला पोहचले आहे. लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शिवपाल यादव, राम गोपाल यादव, संजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विरोधकांचा आरोप आहे की त्यांना पीडितांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.

राजकारण करू नका

दुसरीकडे, विरोधकांच्या वृत्तीवर कठोर भूमिका घेत योगी सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्ष या दुर्दैवी घटनेवर राजकारण करत आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तपासाशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादव