67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:16 AM2024-02-07T08:16:51+5:302024-02-07T08:17:16+5:30

हस्तशिल्पकारांची सरकारकडे मदतीची याचना; निर्यातीचा खर्च परवडेना

67 lakh Indians distressed by war; Unaffordable export costs | 67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इस्रायला समुद्रात रोखण्यासाठी हुथी बंडखोरांनी जगातील सर्वांत व्यस्त मार्ग असलेल्या लाल समुद्रावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. त्यांच्या हल्ल्यांमुळे मालाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातदारांवरही झाला आहे. आता त्यांना अमेरिका किंवा युरोपीय देशांमध्ये माल पाठवण्यासाठी लांबचा रस्ता निवडावा लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हस्तशिल्प निर्यात प्रोत्साहन परिषदेने (ईपीसीएच) सरकारकडे मालवाहतुकीवर अनुदानाची मागणी केली आहे.

नेमके काय संकट?

१५००-२००० डॉलर्स खर्च लाल समुद्राच्या संकटापूर्वी येथून अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत होता.

६,००० डॉलर्सपर्यंत खर्च सध्या अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत आहे. त्यामुळे मालवाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सरकारने काय करावे?
nईपीसीएचचे अध्यक्ष दिलीप बैद यांनी सांगितले की, देशभरात ६७ लाख हस्तकलाकार आहेत, ज्यांचा माल ईपीसीएच जगभरातील बाजारपेठेत नेते. 
nनिर्यातदारांना सबसिडी द्यावी. असे झाल्यास, त्यांचा माल जगभरातील बाजारपेठेत पाठवणे सोपे होईल. जगभरातील बाजारपेठांमध्ये सुस्ती असल्याने भाव मिळत नसल्याने मंदीचीही स्थिती आहे.

...तर कारागीर जगणार कसे? 
हस्तकला वस्तूंचे मूल्य कमी आणि आकार अधिक असतो. जर आपण रत्ने आणि दागिने क्षेत्राकडे पाहिले तर १० हजार डॉलर्स किमतीच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये येतात; पण हस्तकलेच्या वस्तू खूप मोठ्या आहेत. 
कंटेनरमध्ये १५,००० डॉलर्सचा माल बसतो. हा माल बाजारात पाठवण्यासाठी ६,००० डॉलर्स खर्च झाले, तर कारागीर जगणार कसे? असे बैद यांनी म्हटले.

Web Title: 67 lakh Indians distressed by war; Unaffordable export costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.