राष्ट्रपती पदकासाठी ६५ पोलीस अधिकारी

By Admin | Updated: August 15, 2014 03:01 IST2014-08-15T03:01:51+5:302014-08-15T03:01:51+5:30

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध ६५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे

65 police officers for the President's medal | राष्ट्रपती पदकासाठी ६५ पोलीस अधिकारी

राष्ट्रपती पदकासाठी ६५ पोलीस अधिकारी

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या विविध ६५ अधिकारी/कर्मचाऱ्यांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले
आहेत.
पोलीस मुख्यालयातील अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) प्रभात रंजन, मुंबईतील नायगाव हत्यार विभागातील साहाय्यक समादेशक जनार्दन ठोकळ, विशेष शाखेतील साहाय्यक फौजदार दिलीप घाग यांना अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘पीपीएम’ पदक तर सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे, दक्षिण विभागाचे अप्पर आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे अप्पर आयुक्त प्रकाश मुत्याळ आदी ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे.
ड्युटीवर असताना शहीद झालेले पोलीस नाईक गोविंद फराकटे व कॉन्स्टेबल मुन्शी पुघांटी यांना मरणोत्तर पदकाने गौरविण्यात आले आहे. पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकारी/कर्मचाऱ्यांची नावे अशी (कंसात ठिकाण) : निरीक्षक - कुलराम दांडेकर (सोलापूर शहर), विलास जगदाळे (एसआयडी, ठाणे), पंडित राठोड (परभणी), रघुनाथ फुगे (पुणे शहर), श्यामराव तुरांबेकर (रायगड), विनोद अंबरकर (नाशिक शहर), उपनिरीक्षक रमेश वऱ्हाडे (नवापूर), एएसआय - अर्जुन सुतार (एम.आर.ए. मार्ग, मुंबई), पंढरी मारकट्टे (परभणी), भानुदास कदम (सीआयडी, मुंबई), जयचंद गौतम (नागपूर, एसआरपीएफ), मंचक बचाटे (परभणी), ज्ञानेश्वर भूमकर (मलबार हिल), आनंद चोरगे (जुहू, मुंबई), नीना नरखेडे (नागपूर), प्रकाश सावंत (पुणे), अरुण मोरे (नागपूर एसआरपीएफ), शंकर देवकर (हिंगोली), काशीनाथ जाधव (नंदूरबार), बाळू मस्के (ठाणे शहर), राहुल वणे (पुणे एसआरपीएफ), परशुराम राणे (ठाणे मुख्यालय), चंद्रकांत शिंदे (सातारा), डेव्हिड लोबो (पुणे एसआरपीएप्फ), दत्तात्रय जाधव (एसीबी, मुंबई), संभाजी कुंभार (सांगली), मुश्ताक अली (अकोला), सुरेश पाटील (सोलापूर शहर), बाबूराव माने, अशोक भोगन, जयसिंग घाटगे (तिघे पुणे एसआरपीएफ), सोपान गोलहर, बाळकृष्ण देसाई (दोघे दौंड एसआरपीएफ), राजेंद्र अवताडे (अमरावती एसआरपीएफ), हेमंतकुमार पांडे (नागपूर शहर), किशोर बोरसे (मालेगाव), उदय गवाणकर (पुणे एसआरपीएफ), राजाराम सुर्वे (एटीएस पुणे), उपनिरीक्षक दिगंबर पाटील, सुुधीर वाघ, हवालदार विनायक मुनगीवार, पवन अरका, नाईक - सगीर शेख, पंकज घोडेस्वार, श्यामदास उके, सरजू वेलाडी, वासुदेव मदावी, विजय सालम, रविकुमार गदाम, सूर्यकांत अत्राम, नागेश तकाम, येशू तलावी, निरीक्षक नितीन बडगुजर, नागेश तकाम, उपनिरीक्षक संभाजी गावडे, कुमारशहा उसेडी व हवालदार भय्याजी कुलसंगे. (प्रतिनिधी)

Web Title: 65 police officers for the President's medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.