‘स्वामित्व योजने’द्वारे ६५ लाख जण जमिनीचे मालक, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार कार्डचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:19 IST2025-01-18T08:19:11+5:302025-01-18T08:19:23+5:30
‘स्वामित्व योजना’ ही पंचायत राज मंत्रालयाची योजना आहे.

‘स्वामित्व योजने’द्वारे ६५ लाख जण जमिनीचे मालक, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार कार्डचे वितरण
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘स्वामित्व योजना’ या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना ६५ लाखांपेक्षा अधिक कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. पंचायत राज मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्रासह दहा राज्ये तसेच जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशातील ५० हजारांपेक्षा अधिक गावांमधील लाभार्थ्यांना ही कार्ड दिली जाणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. ‘स्वामित्व योजना’ ही पंचायत राज मंत्रालयाची योजना आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे जमीनच्या तुकड्यांचा नकाशा तयार केल्यानंतर त्या मालमत्तेचा मालक असलेल्या व्यक्तीला कायदेशीर मालकी हक्क मिळवून देणारे कार्ड दिले जाणार आहे.