शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

देशातील ६३.९२ टक्के रुग्ण झाले पूर्णपणे बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:54 IST

देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १३,८५,५२२ झाली आहे. त्यात दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,८५,५७६वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे. सध्या ४,६७,८८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या ६३.९२ टक्के इतकी आहे. देशात सलग चौथ्या दिवशी ४५ हजारांपेक्षा नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी ३६,१४५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणेबरे झाले असून, त्यांना रुग्णालायतून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या तमिळनाडूमध्ये २०६७३७, कर्नाटकमध्ये ९०,९४२, आंध्र प्रदेशमध्ये ८८६७१, पश्चिम बंगालमध्ये ५६३७७, उत्तर प्रदेशमध्ये ६३७४२, दिल्लीमध्ये १२९५३१, गुजरातमध्ये ५४६२६, बिहारमध्ये ३६६०४, झारखंडमध्ये ७८३६, राजस्थानात ३५२९८, ओदिशामध्ये २४०१३ इतकी आहे. अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनाचे रुग्ण लक्षणीय प्रमाणात आढळून आले आहेत.

दिवभरात ४ लाख ४२ हजारांहून अधिक चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशभरात ४,४२,२६३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, हा आजवरचा उच्चांक आहे. २५ जुलैपर्यंत देशभरातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,६२,९१,३३१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या