झारखंडमध्ये ६१ तर काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान
By Admin | Updated: December 14, 2014 19:20 IST2014-12-14T10:39:20+5:302014-12-14T19:20:04+5:30
झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात ६१ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान झाले.

झारखंडमध्ये ६१ तर काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
रांची/ श्रीनगर, दि. १४ - झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात ६१ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये ४९ टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी तर झारखंडमध्ये १५ जागांसाठी सकाळी सातपासून मदतान सुरू झाले.
काश्मीरमध्ये १८ जागांसाठी १८२ उमेदवार रिगणात होते ७.०५ लाख महिलांसह सुमारे १४ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीनगर, अनंतनाग, शोपियन व सांबा जिल्ह्यातील १ हजार ८९० मतदान केंद्रांवर मतदान झाले. दहशतवादी हल्ला तसेच खराब वातावरण असतानाही मतदारांनी मोठ्या संख्यने मतदानाचा हक्क बजावला.
झारखंडमध्ये १५ जागांसाठी २१७ उमेदवार असून सुमार ४३ लाख नागरिकांनी मतदान करून त्यांचे भविष्य मतपेटीत बंद केले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.